छगन भुजबळांचा थेट सल्ला! “गाडी-बंगला असलेल्यांनी लाडकी बहीण योजनेतून स्वतःहून बाहेर पडा!”
महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण” योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीसाठी मोठा बदल आणण्याच्या दिशेने आहे. दर महिन्याला 21 ते 65 वर्षांच्या पात्र महिलांना १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. पण आता या योजनेवर मंत्री छगन भुजबळ यांनी थेट “गाडी-बंगला असलेल्यांनी योजना सोडावी” असा महत्त्वाचा इशारा दिला आहे!
छगन भुजबळांचा थेट सल्ला! “गाडी-बंगला असलेल्यांनी लाडकी बहीण योजनेतून स्वतःहून बाहेर पडा!”
नाशिक | मेट्रो अपडेट
महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण” योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीसाठी मोठा बदल आणण्याच्या दिशेने आहे. दर महिन्याला 21 ते 65 वर्षांच्या पात्र महिलांना १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. पण आता या योजनेवर मंत्री छगन भुजबळ यांनी थेट “गाडी-बंगला असलेल्यांनी योजना सोडावी” असा महत्त्वाचा इशारा दिला आहे!
छगन भुजबळ म्हणाले, “ही योजना गरिबी आणि श्रमजीवी महिलांसाठी आहे. ज्यांच्याकडे बंगले, गाड्या आहेत, त्यांनी स्वतःहून या योजनेतून माघार घ्यावी. यामुळे खर्या गरजूंना फायदा होईल.”
नाशिकच्या लासलगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळांनी स्पष्ट केलं की, जे नियमांमध्ये बसत नाहीत, त्यांनी कृपया या योजनेपासून स्वतःहून दूर राहावं. “मी आधीच सांगितलं होतं, नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी आपलं नाव काढून घ्यावं. नाहीतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, पण आतापर्यंत दिलेल्या लाभांवर काही कारवाई होणार नाही,” असंही त्यांनी आश्वासन दिलं.
“लाडकी बहीण योजना” ही विवाहिता, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांना दिली जाते. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसेल, आणि ज्यांचं कुटुंब आयकरदाता नसेल, त्यांना याचा लाभ मिळेल.
या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळ मिळेल, आरोग्य सुधारेल, आणि घरात त्यांची भूमिका मजबूत होईल.
“गाडी-बंगला-धारकांनी कृपया नियमांचे उल्लंघन टाळा आणि खरी गरज पाहा,” असा मंत्र देत मंत्री भुजबळांनी योजना अधिक परिणामकारक बनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय.