
आंबेडकरवाद VS मार्क्सवाद हा वाद की दिशाभूल?
बाबासाहेबांच्या निधनानंतर आंबेडकरी चळवळीत सुरू झाला एक वैचारिक संघर्ष –
मार्क्सवाद विरुद्ध आंबेडकरवाद!
इतिहास बोलतोय –
- १९५२: कम्युनिस्टांचा बाबासाहेबांना विरोध
- गायकवाड VS कांबळे – संघटनात्मक संघर्ष
- बागुल, ढसाळ यांना ‘मार्क्सवादी’ ठरवण्याचा अट्टहास
साहित्य, राजकारण, चळवळी – सगळीकडेच फूट
- ‘दलित साहित्य संमेलन’ VS ‘अस्मितादर्श लेखक मेळावा’
- ‘काळ्या कोटातले’ की ‘धोतरातले’ नेतृत्व?
पण सत्य काय?
बाबासाहेबांचा विरोध धर्मांध वर्णशाहीला होता – मार्क्सवादाला नव्हे!
- “फुले, वाटल्यास मार्क्स घेऊ!” – त्यांनी स्वतः म्हटले
- स्वातंत्र्यपूर्व काळात कॉ. डांगे, मिरजकर, ब्रेटली यांच्यासोबत लढले
- स्वतःच्या पार्टीचा झेंडा ‘लाल’ रंगाचा होता!
ढसाळ, बागुल यांच्यावर मार्क्सवादी शिक्के – पण त्यांच्या लेखणीचा आत्मा आंबेडकरच!
“तुझे बोट धरून चालताना…” हे फक्त एक मार्क्सवादी लिहू शकतो का?
आजही या कृत्रिम संघर्षातून संभ्रम पेरला जातो
खरा संघर्ष → आंबेडकरवाद विरुद्ध धर्माध, वर्णवर्चस्ववादी शक्ती!