आपल्या आईचे पर पुरूषाशी अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट आरोपी ऋषिकेश टिळेकर याला कायमच खटकत होती. याचा राग मनामध्ये धरून ऋषिकेशने आईच्या प्रियकराचा गळा दाबून खूण केला. हत्याकांड केल्या नंतर -हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यविधी करण्याची तयारी करण्यात आली. मात्र शवविच्छेदनानंतर खरा प्रकार समोर आला असून राहुरी पोलिसात खुणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या घटनेतील आरोपी ऋषिकेश सतिष टिळेकर राहणार कोल्हार खुर्द याच्या आईचे मयत चांगदेव शंकर टिळेकर यांच्या सोबत अनैतिक संबंध होते. ही गोष्ट ऋषिकेश टिळेकर याला कायमच खटकत होती. दिनांक २४ जुलै रोजी रात्री आठ वाजे दरम्यान आरोपी ऋषिकेश टिळेकर याने त्याच्या आईचा प्रियकर चांगदेव टिळेकर यांचा गळा दाबून खुण केला. घटनेनंतर त्याने नातेवाईकांना फोन करून सांगितले कि, चांगदेव टिळेकर यांना -हदय विकाराचा झटका येऊन ते मयत झाले आहेत. असे सांगून तो अंत्यविधीची घाई करत होता. चांगदेव यांची मुलगी रूपाली बनकर यांना संशय आल्याने त्यांनी मयत चांगदेव टिळेकर यांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.
लोणी येथे झालेल्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चांगदेव टिळेकर यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले. रूपाली अजय बनकर राहणार कर्वेनगर, पुणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी ऋषिकेश सतिष टिळेकर याच्या विरोधात खुणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर आरोपी ऋषिकेश याला ताबडतोब अटक करून गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निरज बोकिल हे करीत आहेत.