लंके यांचे आरोग्य मंदिर राज्यात आगळे वेगळे !

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

                              राज्यात अनेक कोव्हिड सेंटर असतील मात्र लंके यांचे कोव्हिड सेंटर राज्यातआगळे वेगळे आहे. त्याचाच ठसा राज्यभर उमटला आहे. उत्तम पद्धतीच्या भोजन व्यवस्थेबरोबरच सर्व प्रकारची काळजी तेथे घेतली जात असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढले.

 

 

 

जालना येथील  १०० शिक्षक क्लबच्या वतीने आयोजित कोरोना योद्धयांचा सन्मान कार्यक्रमात आ. नीलेश लंके यांचाही गौरव करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात काम करणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर्सचाही यावेळी सन्मान करण्यात आला. चांगले काम करणारांच्या पाठीशी समाजही उभा राहतो.  त्यामुळे त्यांच्या कोव्हिड सेंटरला मदतीचा ओघ नेहमीच राहिला आजही आहे, पूर्वीही होता. सामाजिक काम करणारे अनेक लोक असतात, मात्र सगळयांच्याच पाठीशी लोक उभे राहत नाहीत. काही लोक समर्पीत भावनेने, निःस्वार्थ भावनेने काम करतात त्यात नीलेश लंके हे आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून आदर्श घडविल्याचे गौरवोदगार  टोपे यांनी काढले.  लोकप्रतिनिधीने कसे काम केले पाहिजे त्याचा आदर्श आ. नीलेश लंके यांनी घालून दिला आहे. असेही टोपे म्हणाले.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा.

 

 

 

 

आ. नीलेश लंके म्हणाले, पवार साहेबांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या आमच्या आरोग्य मंदीराचे उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांचा पायगुण चांगला असल्यामुळेच तेथून तब्बल २१ हजार रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. हे सर्व करीत असताना  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळवेळी मार्गदर्शन केले, मदत केली. मंत्री टोपे यांनीही वेळोवेळी फोन करून आरोग्य मंदीरासाठी काही अडचण आहे का, रेमडेसिवीर इंजेक्शन, औषधे आहेत का, आरोग्य कर्मचा-यांची आवष्यकता आहे का याची चौकशी केली  आजही त्यांचे आमच्या आरोग्य मंदीराकडे लक्ष असल्याचे आ. लंके म्हणाले.