नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी

ऍड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

                              प्रक्षोभक द्वेषपूर्ण विधाने करुन धर्मा-धर्मात द्वेष पसरविणार्‍या व जातीय तेढ निर्माण करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वती गझियाबाद, उत्तर प्रदेश यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या खाजगी तक्रार अर्जावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी अतिरीक्त मुख्य न्यायाधिश तेजस्विनी निराळे यांच्या कोर्टात युक्तिवाद केला. सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्ट अर्शद शेख व अनंत लोखंडे यांनी येथील न्यायालयात कलम 200  नुसार खाजगी तक्रार अर्ज दाखल करून भारतीय दंड विधानात 153 अ, 153 ब, 295 अ, 505 नुसार धर्मांध, द्वेषपूर्ण विधाने करून राष्ट्रीय एकात्मता दुषित करुन धर्माच्या आधारे तेढ निर्माण करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे.

 

 

 

 

 यती नरसिंहानंद सरस्वती हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल करुन दोन धर्मात द्वेष निर्माण होईल अशा पध्दतीने गरळ ओकत आहे. त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांनाच देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालवला आहे. या संदर्भात तक्रारदारांनी तोफखाना पोलीस स्टेशनला नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशनला गेले होते. सदर प्रकरणी पोलीस अधिक्षकांना  निवेदन देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कारवाई झालेली नाही. शेवटी जिल्हा न्यायालयात नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी खाजगी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर दि.26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

 

अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले की, नरसिंहानंद सरस्वती यांचे कृत्य धर्मांधतेचे प्रतिक आहे.  अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाल्यास कट्टरवादी धर्मांधांना लगाम लागणार आहे. विषारी जातीयवादी प्रवृत्ती नव्हे, तर विचारी जातीय एकात्मता जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी  अर्शद शेख म्हणाले की,प्रशोभक भाषण करुन देशातील जातीय द्वेष पसरवीत आहे. कोणताही धर्म माणसाला माणसापासून तोडत नाही. माणसाला माणसापासून दूर करणारा हा अधर्म आहे. काही महाराज धर्माच्या नावाखाली देशाची शांतता भंग करण्याचे काम करत आहे. देशाची एकात्मता अखंडित ठेवण्यासाठी कायदेशीर पध्दतीने लढा देण्याचे काम करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. सरोदे यांच्यासह अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अक्षय देसाई, अ‍ॅड. फारुक बिलाल, अ‍ॅड. शाकिब शेख, अ‍ॅड. इरफान शेख यांनी काम पाहिले.