पैशासाठी पत्नीचा केला छळ..

त्रासाला कंटाळून पीडितेची पोलीस ठाण्यात फिर्याद

 

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

तू मला आवडत नाहीस. तूला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. असे म्हणत घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत. या मागणीसाठी सौ. पल्लवी साबळे या विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.सौ. पल्लवी श्याम साबळे वय २२ वर्षे राहणार मिशन कंपाऊंड, राहुरी. या तरूणीचा विवाह दोन वर्षापूर्वी राहुरी येथील स्टेशन रोड, गावठाण येथे रहिवाशी असलेला श्याम गुलाब साबळे याच्याशी झाला होता. सुरूवातीचे पाच महिने सासरकडच्या लोकांनी पल्लवी हिला व्यवस्थित नांदवीले.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

 

त्यानंतर नोव्हेंबर २०१९ पासून पल्लवी हिचा छळ सुरू झाला. दरम्यान पल्लवी हिचा पती श्याम हा तू मला आवडत नाहीस. तूला व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही. असे म्हणून पल्लवी हिला शिवीगाळ व लाथा बूक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचबरोबर घरातील इतर घर बांधण्यासाठी लोक माहेरहून ५० हजार रूपये आणावेत. यासाठी सतत टोमणे मारत. वेळ प्रसंगी उपाशी ठेवत. मारहाण करून दम देत असत. या सर्व प्रकारातून दिनांक १२ मार्च रोजी पल्लवी हिचा पती श्याम व इतर लोकांनी ५० हजार रूपये आणावेत. यासाठी तिला घरातून हाकलून दिले. तसेच तू जर पैसे आणले नाहीत तर तूला जिवंत सोडणार नाही. असा दम दिला. अखेर दिनांक ११ ऑगस्ट रोजी पल्लवी श्याम साबळे हिने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार कथन केला.

 

 

 

 

 

तिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी पती श्याम गुलाब साबळे, सासू लिलाबाई गुलाब साबळे, दिर रमेश गुलाब साबळे तसेच जाव स्वाती रमेश साबळे सर्व राहणार स्टेशन रोड, गावठाण. या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.