दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हा आपला उद्देश

आय टी पार्क बंद पडू देणार नाही : आ. संग्राम जगताप

अहमदनगर (संस्कृती रासने )

 

नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी  पत्रकार परिषद घेऊन किरण काळे यांनी केलेल्या दाव्याचा इन्कार केलाय. काळे यांनी हे आय टी पार्क नावाला सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जगताप यांनी आपली भूमिका मांडली .

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

नगरमधील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आपण नगरच्या एमआयडीसीतील आय टी पार्क सुरु केला. लोकडाऊनच्या अगोदर या आय टी पार्क द्वारे नगरमधील दहाहजार तरुणांना रोगावर उपलब्ध व्हावा अशी आमची या आयटी पार्क सुरु करण्यामागची संकल्पना होती . मात्र यात राजकारण आणून निव्वळ सवंग प्रसिद्धीसाठी या पार्क च्या उभारणीबाबत खोटेनाटे आरोप केले जात आहेत. आय टी पार्क माझ्या एकट्याचा नाही जर तुमच्यात धमक असेल तर तुम्ही या आय टी पार्क मध्ये कंपन्या आणाव्या पण तिकडे जाऊन धिंगाणा घालू नये , तेथे काम करणाऱ्यामध्ये महिलावर्गाची संख्या जास्त आहे. तेव्हा काहीतरी विनाकारण खुसपट काढून त्या आय टी पार्कमध्ये घुसून धुडगूस घालणे योग्य नाही . या घटनेने तेथे  घबराटीचे वातावरण आहे. यामुळे जर आय टी पार्क बंद पडला तर शेकडो तरुणाच्या पोटावर पाय देण्याचे पाप तुमच्या हातून घडेल तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हे आय टी पार्क चालविणाऱ्या कंपन्या आपण बंद पडू देणार नाही आय टी पार्क हे कुण्या एकट्याच्या मालकीचे नाही ते काही राजकीय पक्षाचे कार्यालय नाही त्यामुळे हे आय टी पार्क आपण बंद पडू देणार नाही उलट तिथे आणखी आय टी कंपन्या आणण्याचा आपण प्रयत्न करू असा निश्चय आमदार संग्राम जगताप  यांनी केलाय.

 

 

     नगरच्या एम आय डी सी त आय टी पार्क मध्ये जाऊन काँग्रेस शहर अध्यक्ष किरण काळे यांनी गोंधळ घातला. तेथील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॉक डाउनच्या नावाखाली घरी पाठवले. आणि त्याचे पगार दिले नाही . तिथे तुरळक आय टी कंपन्या स्टार्ट अप च्या नावाखाली सुरु असल्याचा आरोप काळे यांनी केला. त्याला उत्तर देण्यासाठी जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

  आमदार संग्राम जगताप यांनी आय टी पार्कच्या रूपाने  एक रोपटे लावले आहे. त्यामुळे शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पण हे रोपटे वटवृक्षात रूपांतरित करण्याची जबाबदारी सर्व पक्षीयांची  आहे.  हा वटवृक्ष होण्या अगोदर तो तोडण्याचे काम आम्ही होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हा आय टी पार्क बंद पडू देणार नाही असा निश्चय उपमहापौर गणेश भोसले यांनी बोलून दाखवला. पत्रकार परिषदेनंतर आपण स्वतः आय टी पार्क ला भेट देऊन तेथील कंपन्यांच्या व्यवस्थापनांना आणि कर्मचाऱ्यांना धीर देणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. आणि किरण काळे यांनी दावा केलेले सर्व मुद्दे या पत्रकार परिषदेत खोडून काढले.