नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा

दुपारी तीन नंतरही अर्ज माघारीची प्रक्रिया सुरु ठेवल्याने प्रमोद मोहळे आणि उमेदवारांमध्ये धराधरीचे नाट्य

अहमदनगरमध्ये नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. बँक बचाव कृती समिती आणि सहकार पॅनलमध्ये मनोमिलन होण्याची प्रक्रिया सुरु असताना अर्ज माघारीच्या वेळेवरून या निवडणुकीतील उमेदवार आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष प्रमोद मोहोळे यांनी गोंधळ घातला. प्रमोद मोहोळे आणि इतर उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. मोहोळे आणि समर्थकांत हे धराधरीचे नाट्य बराच काळ सुरु होते.

 

 

 

 

 

          दिनांक १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर अशी अर्ज माघारीची मुदत होती. अर्बन बँक संचालक पदाची निवडणूक बिनविरोध करावी यासाठी अर्बन बँक बचाव कृती समितीकडून प्रयत्न सुरु होते .आता अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी कृती समितीला यात यश आल्याचे दिसते आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हा निबंधक कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांचे समर्थक आलेले होते.

 

दुसरीकडे बँक बचाव कृती समिती आणि सत्ताधारी सहकार पॅनलची बोलणी सुरु होती. अर्ज माघारीचे १२ दिवस संपून गेले तरी वाटाघाटी वेळोवेळी फिस्कटत होत्या . अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आणि बँक बचाव कृती समितीच्या प्रयत्नाना यश आले पण तोपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत संपलेली होती.

 

 

 

 

 

तरी देखील सभागृहात अर्ज माघारी घेणयासाठी उमेदवार उपस्थित होते. दुपारी तीन नंतर अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी करून प्रमोद मोहोळे यांनी तिथे अधिकाऱ्यांना विरोध केला. तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी  उपस्थित सर्व उमेदवारांचे माघारीचे अर्ज जमा करून घेऊन ही प्रक्रिया आपण थांबववत असल्याचे जाहीर करून सभागृहातून कर्मचारी निघून गेले. त्याचवेळी प्रमोद मोहोळे याना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

बँकेच्या हितासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा सर्व संचालकांचा मानस आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या नेत्याकडे बराच अवधी होता तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत ही अर्ज माघारीची प्रक्रिया सुरु ठेवण्याची गरज का पडली. आणि या निवडणुकीतही रात्रीस खेळ चे प्रकार का करावे लागले असा प्रश्न सामान्यसभासदांना पडतोय. अखेर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही या संदर्भात उपनिबंधक आहेर यांचाच निर्णय अंतिम ठरणार आहे.