‘ बँक बचाव ‘ ची माघार

अर्बन बँकेच्या १४ जागांसाठी निवडणूक ; चार जागा बिनविरोध

नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह  बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकार पानेलची एकहाती सत्ता बँकेवर प्रस्थापित होण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे. एकूण १८ पैकी चार मतदारसंघात केवळ एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने, या जागा बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. इतर दोन मतदारसंघातील १४ जागांसाठी मतदार होत असून , २१ उमेदवार रिंगणात आहेत.

 

 

शिल्लक अर्जांपैकी सहकार पॅनेलच्या उमेदवारांबरोबर अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे या जागांच्या निवदिचीही चुरस संपली आहे. त्यामुळे बँकेवर एकहाती सहकार पॅनेलची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार पॅनलचे प्रमुख सुवेंद्र गांधी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ येणार आहे.

 

 

नगर अर्बन बँक आधीच अडचणीत आहे. निवडणूक लादून मोठ्या खर्चाचा बोजा बँकेवर पडेल,. सभासदांच्या हितासाठी हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचे म्हणणे होते, तरीही विरोधकांनी अर्ज दाखल केले . निवडणूक होऊन बँक आणखी अडचणीत यू नये म्हणून आमच्या बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याचे पॅनलचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

 

 

 

 

 

 

अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर सायंकाळी या पॅनेलच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गांधी यांच्यासह मनोज गुंदेचा, संजय छल्लारे, राजेंद्र काळे, अच्युत पिंगळे, तसेच इतर नेते उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

अर्ज मागे घेण्याबाबत आपली भूमिका मांडतांना गांधी म्हणाले, कि २०१४ ते १९ दरम्यान बँकेच्या संबंधित संचालक मंडळाने अनेक गैरव्यवहार केले. बँकेच्या ताळेबंद च खोटा लिहिला. कर्जदारांकडून रक्कम स्वीकारल्याचे निदर्शनास आले. हे बँकेला घटक आहे. साबंशितांवर निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली होती, परंतु अशाही परीस्थित संबंधित माजी संचालक पुन्हा निवडणुकीस उभे राहिले. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने बँकेवर पुन्हा निवडणुकीची वेळ येऊ शकते. सध्या बँक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यास बँकेकडे रक्कम शिल्लक नाही. असे असतांना आणखी खर्च कशाला करायचा, म्हणून हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचे म्हणणे होते.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

 

 

केवळ मागील संचालक मंडळातील गैर व्यवहाराचा आरोप असलेल्या लोकांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असे आमचे म्हणणे होते. तथापि, हे विरोधकांना मान्य झाले नाही. बँकेवर निवडणूक लादून अडचण वाढविणे योग्य नाही. त्यामुळे आमच्या पॅनेलमधील २२ जणांनी अर्ज मागे घेतले. एकूण १८ पैकी एका जागेवर आम्ही उमेदवार दिलाच नव्हता. उर्वरित १७ जागांसाठी १७ व इतर अपक्ष पाच, अशा २२ उमेदवारांनी माघार घेतली.