भरोसा सेल ने खुलवला अनेकांचा संसार

अहमदनगर – -नगरचा भरोसा सेल चे काम अतिशय उत्कृष्ट रित्या चालले असून सेल मधून झालेल्या समुपदेशनामुळे अनेक कुटुंबाचे आनंदी जीवन जगत असून सुखाने नांदत आहेत . कुटुंबातील वाद कोर्टात जाण्याअगोदर मिटवले जात आहेत असे सांगत वर्षभर भरोसा सेल ने केलेल्या कामावर आपण समाधानी असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांनी सांगितले .
 भरोसा सेलचा वर्षभरातील कामकाजाचा उपनिरीक्षक शेखर यांनी आढावा घेतला .यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल ,पोलिसनिरीक्षक विलास पुजारी ,भरोसा सेल चा सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे ,आदी उपस्थित होते . अधीक्षक म्हणाले , भरोसा सेलमधील कर्मचारी या विभागात काम करताना अधिक समाधानी आहेत , भरोसा सेल मध्ये काम करत असताना आत्मिक समाधान मिळते . अशी येथील कर्मचाऱ्यांची भावना आहे . चांगले काम करत असल्याने कौटुंबिक जीवनावर त्याचा चांगला परिणाम होतो , कारण अनेकांचे संसार फुलवण्याचे काम हा विभाग करत आहे . अनेकांमध्ये वाद विवाद त्यांनी मिटवले आहेत . जेष्ठांना देखील न्याय मिळून दिला आहे .
भरोसा सेल मध्ये २०२१ मध्ये २ हजार १८३ अर्ज प्राप्त झाले होते , त्यापकी ८८९ प्रकरणात समझोता झाला . जेष्ठ नागरिकांचा एकूण १३ तक्रारी आल्या होत्या त्यांचाही अडचणींचे निरसन झाले आहे .  येथे आलेला प्रत्येक प्रकरण सामाजिक भावनेतून हाताळले जाते . त्यामुळे तक्रार दरांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सेलचा सहायक निरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी सांगितले