बारामतीतील गोंधळानंतर नगरमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी सावध

स्ट्रॉंग रूम बाहेर ठोकला तंबू 24 तास पहारा

अहमदनगर: बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावरून शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये सावध भूमिका घेतली आहे. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर चोवीस तास पहारा सुरू केले आहे. अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर मंगळवारी 3734 मतदान यंत्र नगर एमआयडीसीतील वखार महामंडळात सीलबंद करण्यात आले. या गोदाम भोवती केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला हे 24 तासातून दोन वेळा ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला भेट देत आहे. या परिसरातील वाहतूक देखील दुसऱ्या मार्गाने वळवली आहे. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम आहेत. तंबू देऊन 24 तास पहारा देत आहे. त्यांच्यासाठी निवडणूक विभागाने सीसीटीव्ही फुटेजचे स्क्रीन उपलब्ध करून दिले आहे. 13 मे रोजी मतदान झाल्यानंतर सर्वप्रथम नगर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे वखार महामंडळात पोहोच झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक तालुक्यातून मतदान यंत्रे पोहोचली. मतदान झाल्यानंतर ग्रामीण भागातून ईव्हीएम मशीन प्रथम तालुक्याच्या ठिकाणी आणली गेली. तिथून एकत्रितपणे नगरच्या वखार महामंडळाच्या गोदामात पोहोच करण्यात आली.