अहमदनगर शहर हे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. शिवसेनेचा अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी अहमदनगर मध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात स्वर्गीय अनिल राठोड यांचे मतदार संघावर नेहमीच वर्चस्व होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गडाकडेच राहील. असा प्रयत्न करण्याचा आश्वासन, शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांनी शिवसैनिकांना दिले.
नगर भेटीस आले असता, विलास घोगरे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले. यामध्ये शिवसेनेचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामाला लागावे. पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहील. त्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.