गॅसचा काळाबाजार बारकोडमुळे रोखला जाणार

शासनाचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवल यांनी आयोजित केलेल्या ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांनी प्रस्ताव सादर केला आहे. पेट्रोल इंधन असलेले काही दुचाकी रिक्षा आणि चार चाकी वाहन चालक घरगुती गॅसचा बेकायदेशीर इंधन म्हणून वापर करत आहे. काही ठिकाणी बेकायदा गॅस रिफलींग सेंटर आहे. या ठिकाणांवरून वाहनांमध्ये घरगुती गॅस इंधन म्हणून भरला जात आहे. या प्रक्रियेमध्ये गॅसचा अनेकदा स्फोट झालेला आहे. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. वाहनांच्या ही स्फोटात वाहनांच्याही स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. अशी वाहने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे नागपूर येथील ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून घरगुती गॅसच्या गैरप्रकारांवर जनजागृती करत आहे. या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविद्यालयात व्याख्याने आयोजित केली होती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या रस्ते सुरक्षा सप्ताहांमध्ये ही वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. राज्य शासनाचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देऊन घरगुती गॅसच्या काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बैठक घेतली. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांनी विशेष मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं सोळंके यांनी काळ्या बाजाराबाबत व संबंधित बाबींवर सविस्तर माहिती दिली ग्राहकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाकडून कठोर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर अंकुश लावण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंग आणि बारकोड प्रणाली अमलात आणणे हा एक प्रभावी उपाय म्हणून वापरता येईल या पद्धतीमुळे कारवाईमध्ये गतिमानता येऊन गॅसचा पुरवठा करणाऱ्यांची नावे तात्काळ निष्पन्न होणार आहेत.