नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतमोजणी आज अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात एकूण 64,848 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदामात 30 टेबलांवर होणार आहे. मतमोजणी केंद्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गडाम यांनी केली. तसेच मतमोजणी या संदर्भात आवश्यक सूचना त्यांनी त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सलीमठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री, आयुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर व विभागातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Next Post