अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची पदावरून उचलबांगडी  

अहमदनगर :

नव्यानेच रुजू झालेले आणि धडाकेबाज कारवाईचा आव आणणारे अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची  या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे.  तर श्रीरामपूर विभागाच्या पोलीस उप अधीक्षकपदी नगरचे कर्तबगार डी वाय एस पी संदीप मीटके यांची बदली करण्यात आली आहे. तर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे  यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आलीय.

 

नगर शहरासह जिल्ह्यात मध्यंतरी पोलीस खात्यातील काही अवास्तव कर्तव्य दक्षपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या काही धाडी आणि उघडकीस आणलेली प्रकरणे पोलीस दलाचीच बदनामी करून गेली आहेत. याचा परिणाम १५ दिवसातच बदलून नगर जिल्ह्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीत झालाय. सरकारने आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने असा तडकाफडकी निर्णय घेण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कॉन्स्टेबल मधील मोबाईलवर झालेले संभाषणच याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते आहे. ही ऑडिओ क्लिपच मेट्रो न्यूज च्या हाती लागलीय. यात नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कसे हप्ते गोळा करतात .अधिकाऱ्यांना किती हप्ते वाटप होते. आणि साहेबापर्यंत कशी वाटावाटी केली जाते याचा खुलासा या ऑडिओ क्लिप मधून होतो आहे.

आपली ड्युटी बजावत असताना कर्तव्य दक्षतेचा आव आणून कशाप्रारे मलिदा गोळा करतात आणि निर्ढावलेल्या भाषेत कसे बोलतात याचा खुलासा यातून होतॊ आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी अशा प्रकारे हप्तेखोरी करून जर गुन्हेगारी विश्वाला चालना देण्याचे काम करीत असतील तर या लोकशाही असलेल्या देशात सामान्य माणसाने अन्याय अत्याचार सहन करीतच जगायचे का . कायदा सुव्यवस्थेची आई समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी  जर आपल्या आपल्या आयुष्यात अवैध मार्गाने पैसे कमावणे असेच ध्येय मानले तर या देशात जगायचे कसे असा प्रश्न जनसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही .

 

वास्तविक ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तर या अधिकाऱ्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई होऊन त्याला तात्काळ तुरुंगात रवाना करावं असं हे कृत्य आहे. मात्र त्यांची खातेनिहाय चौकशी आणि बदली किंवा फारतर फार निलंबन अशी थातुर मातुर कारवाई होऊन या प्रकरणावर पडदा टाकला जाईल कारण खालपासून वर पर्यंत हप्ते खोरीची ही साखळी आहे. कॉन्स्टेबल पासून गृहमंत्र्या पर्यंत ही चेन असल्याने मध्यंतरी नगरमध्ये झालेली गुटका , भेसळीचे डिझेल , पेपर फुटी प्रकरण आणि वाळू तस्करावर झालेल्या कारवाया ज्या अधिकाऱ्याने केल्या त्यांचीच बदली करण्यात आली खरी पण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदावरून पाय उतार करण्याची हिम्मत या लोकशाही राज्यात कुणाकडे ही नाही हेच यातून सिद्ध होते आहे.