बायडेन सरकारची मोठी योजना : ऑक्टोबरपासून लागू

अमेरिकेत येऊन स्टार्टअप सुरू केल्यास पाच वर्षे राहण्याची संधी, 60000 भारतीयांना याचा फायदा

अमेरिकेत राहण्याचा मार्ग भारतीयांसाठी आता सुकर झालेला आहे. राष्ट्रपती जो बाआयडन यांच्या सरकारने स्टार्टअप अँड स्टे नावाची एक नवीन योजना ऑक्टोबरपासून आणली आहे.त्यानुसार दोन कोटी रुपये गुंतवणुकीचा स्टार्टअप सुरू केल्यास अमेरिकेत पाच वर्ष राहण्यास भारतीयांना परवानगी मिळणार आहे. उद्योगपतींची पत्नी अथवा पती आणि स्टार्ट अप चे तीन लोक त्यांच्या व्यतिरिक्त अमेरिकेत राहू शकतात उद्योगपतीला दोन कोटी रुपयांची गुंतवणूक अमेरिकेकडून घ्यावी लागेल त्यासाठी उद्योगपतींना भारतातून स्टार्टअप प्लॅन आधी पाठवावा लागेल कोणताही अमेरिके गुंतवणूकदार दोन कोटी रुपये गुंतवून भारतातून उद्योगपतींना बोलावू शकतो आणखी एका तरतुदीनुसार भारतीय उद्योगपतीला अमेरिकन सरकारकडून थेट स्टार्टअप साठी 88 लाख रुपये अनुदान मिळाल्यास तोही येऊ शकतो ऑक्टोबर मध्ये सुरू होणाऱ्या या योजनेचा जवळपास 60000 भारतीयांना फायदा मिळू शकतो या स्टार्टअप ला पाच वर्ष झाल्यानंतर पुढे स्टार्ट अप अँड स्टे योजनेत भारतीय स्टार्टअप उद्योगपती आपला मुक्काम वाढवू शकतील मात्र त्यासाठी व्यवसायाची वाढ असणे आवश्यक आहे ती सकारात्मक असल्यास उद्योगपती पाच वर्ष आणखी तिथे राहण्यास पात्र ठरू शकतो अथवा त्याला ग्रीन कार्डही मिळू शकते