अण्णाभाऊ साठे : जन्मदिनी विनम्र अभिवादन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आज जयंती. जनतेकडून लोकशाहीर हा किताब मिळाला. असे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी त्यांनी अमर शेख यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून जनजागृती केली होती त्यांचा जन्म 1920 सलि झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आपल्या वाटेगावहून पायी प्रवास करत त्यांनी मुंबई गाठले.शिक्षण न घेताही ते विचार प्रवृत्त बनले. आणि मार्क्सवादाकडे प्रामुख्याने झुकले. अवघ्या अवघे 49 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. पण त्या काळात त्यांनी 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, 10 पोवाडे, 12 चित्रपट कथा आणि 1 प्रवासवर्णन. एवढ्या मोठ्या साहित्याची निर्मिती केली. आजपर्यंत ‘फकीरा’ या कादंबरीच्या 17 आवृत्ती निघाल्या आहेत. त्यांच्या कथा निरनिराळ्या 27 भाषांमध्ये ही अनुवादित आहेत. त्यांच्या हयातीत महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 1963 मध्ये लोकराज्याचा विशेष अंक ही प्रसिद्ध केला होता.
सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन करूनही प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी शिक्षण हा प्रवास सोपेपणाने घडला नाही. त्यांच्या कुटुंबाच्या हालाखिच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. तरीही लहानपणापासूनच कुतूहल आणि ज्ञानाची तहान त्यांच्यात सदोदित जागृत होती. औपचारिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतला नसलं तरीही जीवनाच्या शाळेत त्यांना अनेक अनुभव मिळाले, अनेक धडे त्यांना गिरवायला मिळाले. थोडक्यात शाळेच्या पटावर जरी त्यांचे नाव नसले तरीही दीन दलितांच्या हृदयात मात्र त्यांनी आपल्या कृतीनं आणि आपल्या लेखणीने नाव कोरलेले आहे. त्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे लेखन हे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत गांजलेल्यांची पीडा व्यक्त करणारे आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक योगदान हे सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाचे एक सशक्त माध्यम होते. याशिवाय दलित पॅंथर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जो दलितांच्या हक्कांसाठी, सामाजिक राजकीय चळवळीमध्ये महत्त्वाचा मानला गेला. चळवळीद्वारे त्यांनी प्रामुख्याने जातीभेदावर कडाडून टीका केली. असे असूनही अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये लोकसंगीताचा एक अंश पाहायला मिळतो. या लोकसंगीताद्वारे त्यांनी जनसामान्यांशी संवाद साधण्याचा एक उत्तम प्रयत्न केला. त्याद्वारे त्यांनी आपले विचार आणि संगीताची उत्तम सांगड घातली.
थोडक्यात महाराष्ट्रातील उपेक्षित समाजापासून ते भारतीय आणि जागतिक साहित्याच्या व्यापक प्रेक्षकांपर्यंत अण्णाभाऊ साठे यांचा प्रभाव खोलवर दडलेला आहे. त्यांचे जीवन आणि कार्य सामाजिक बदलाचे साधन म्हणून यांची आठवण सातत्याने करून देते. अशा अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.