वायनाड : ‘केरळमधील वायनाड जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेअधि केरळला अनेक अलर्ट देण्यात आले होते.’ असा दावा अमित शहा यांनी संसदेत केला असून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र आम्हाला दुर्घटनेपूर्वी कोणतेही रेड अलर्ट मिळाले नव्हते. असे म्हटले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 127 तर जखमीचा आकडा 229 हन जास्त झाला आहे. तर अद्याप 180 जण बेपत्ता आहे. दरडेच्या ठिकाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध सुरू असून दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरडीच्या ढिगार्यांकडून सुमारे 1000 लोकांची लष्करी जवानांनी मंगळवारी रात्रीपर्यंत सुटका केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. मंगळवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत वायनाड जिल्ह्यातील मुंडकाई आणि चुरणमाला येथे 300 घरे पूर्णपणे उध्वस्त झाली. मृतांपैकी 75 जणांची ओळख पटली असून 123 जणांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. बचाव कार्यात सापडलेले मृतदेह आरोग्य केंद्रात तसेच निलांबुर सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत. दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या बचाव कार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफचे जवान सहभागी झाले आहेत.या ढिगार्याखाली जवानांना सापडलेल्या मृतदेहांमध्ये अनेक मृतदेह हे जमिनीवर झोपलेल्या किंवा बसलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचवेळी मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे अशा वेळी मृतदेह काढताना जवानांच्या डोळ्यांतही काळजी आणि करुणा दाटलेली दिसून येते. उध्वस्त झालेली घरे, चिखल यांच्या ढिगार्याखाली अडकलेल्या माणसांची सुटका करताना खराब हवामानामुळे जवानांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
Prev Post