तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा नियुक्ती नाही

2001 च्या अधिसूचनेनुसार हायकोर्टाने फेटाळला दावा

मुंबई;सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक मुले आहेत. त्यामुळे त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीचे लाभास अपात्र आहे. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. याचिका कर्त्याला अनुकंपा नियुक्त अपात्र ठरवल्यानंतर मात्र या निर्णयाला आव्हान दिले होते. न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्याय. राजेश पाटील यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. प्रतिवादीने केलेला दावा निर्णयाचा विचार केला असता, आमच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे खंडपीठाने व्यक्त केले होते. विद्या अहिरे यांच्या पतीचा 11 फेब्रुवारी 2013 रोजी मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पतीच्या जागेवर मुलाच्या अनुकंपा नियुक्तीसाठी मागणी केली होती. 28 मार्च 2001 च्या अधिसूचनेनुसार दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येते.