चर्मकार समाजातील घटक म्हणूनच या समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील -आमदार संग्राम जगताप

चर्मकार विकास संघ, घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स व अडसूळ परिवाराचा पुढाकार

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. मात्र चर्मकार विकास संघा सारख्या सेवाभावाने योगदान देणार्‍यांमुळे आर्थिक दुर्बल घटक असलेल्या समाजबांधवांना आधार मिळाला. कष्टकरी बांधव म्हणून ओळख असलेल्या चर्मकार समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहणार आहे. समाजातील एक घटक म्हणूनच या समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन  आमदार संग्राम जगताप यांनी केले.

 

 

 

 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिक संकट ओढवलेल्या कष्टकरी बांधवांच्या कुटुंबीयांना चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या वतीने स्व. पांडुरंग अडसूळ व स्व. नंदा अडसूळ यांच्या स्मरणार्थ किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव सुभाष चिंधे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, इंजि. अजय अडसूळ, बलराज गायकवाड, महिला आघाडी प्रमुख रुख्मिणी नन्नवरे, गणेश लव्हाळे, कचरू जाधव, भाग्यश्री अडसूळ, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

कचरू जाधव यांनी प्रास्ताविकात कोरोनाने आर्थिक संकट ओढवलेल्या कष्टकरी बांधवांना आधार देण्यासाठी आई-वडिलांच्या स्मरणार्थ इंजि. अजय अडसूळ यांनी हा उपक्रम राबविल्याचे स्पष्ट केले. सुभाष चिंधे यांनी चर्मकार विकास संघाच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात समाजातील गरजू घटकांना मदत देण्यात आली आहे. ही मदत अविरतपणे सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. रुख्मिणी नन्नवरे यांनी चर्मकार समाजातील कष्टकरी बांधवांसाठी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महिलांनी जागृक राहून कुटुंबीच्या कल्यासाठी या योजना पदरात पाडून घेतल्या पाहिजे. यासाठी जागृक राहण्याचे त्यांनी आवाहन केले. सागर बोरुडे यांनी चर्मकार विकास संघाच्या वतीने टाळेबंदीत भरीव मदत पाठविण्यात आली. संपुर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांना मदतीचा हात देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

संजय खामकर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून चर्मकार विकास संघ सामाजिक योगदान देत आहे. महाराष्ट्रातील दहा हजारपेक्षा जास्त गरजू कुटुंबीयांना मदत देण्यात आली. चर्मकार समाजाच्या पाठिशी नेहमीच आमदार जगताप यांचे योगदान राहिले असून, चर्मकार समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. चर्मकार समाजातील सदस्य म्हणूनच त्यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. सदर उपक्रम अडसूळ परिवाराच्या आर्थिक सहयोगातून राबविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले.