सामाजिक कार्याला अध्यात्मिक सेवेचे पाठबळ- सचिन महाराज पवार
बारा बलुतेदार महासंघाची संत सेना महाराज मंदिरांना देणगी
नगर- समाजात होत असलेला विकास जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांना धरून होत नसेल तर या मूल्यापासून वंचित असलेल्या समूह एका समान पातळीवर नेतृत्व, विचारप्रणाली कार्यकर्तेया सर्वांचे नियोजन करून एकत्र येतो त्या प्रमाणे अहिल्यानगर बारा बलुतेदार महासंघाची वाटचाल सुरू आहे समाजातील प्रश्नांबरोबरच सामाजिक कार्याला महत्त्व देत आता अध्यात्मिक क्षेत्रात देखील चांगले काम करीत आहे. त्यामुळे सामाजिक कार्याला अध्यात्मिक सेवेचे पाठबळ मिळते ही बाब महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन सचिन महाराज पवार यांनी केले.
अहिल्यानगर येथे बारा बलुतेदार महासंघा तर्फे नव वर्षाचे स्वागत संत सेना महाराजांच्या दोन मंदिराच्या बांधकामाला दहा हजार रुपयांची देणगी देऊन करण्यात आले. नेवासा व आष्टी तालुक्यातील धानोरा येथे सुरू असलेल्या मंदिराला प्रत्येकी 5 हजार रू.ची देणगी दिली. हभप सुनील महाराज पवार हभप परमेश्वर गायकवाड महाराज यांच्याकडे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी मदत सुपूर्त केली.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष व नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष माउली गायकवाड, व्हीजेएनटी शहर जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नाभिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक निखिल वारे, सुनिल त्रंबके, बाळासाहेब पवार, सुनील भिंगारे अनिल निकम, पारनेरचे मनोहर राऊत, गणेश खंडागळे, डॉ.सुदर्शन गोरे, बाळासाहेब इवळे, लवेश गोंधळे, जामखेडचे शिवकुमार डोंगरे, नितीन राऊत, राहुरीचे दत्ता दुधाडे, जना वाघ, अनिल इवळे, मच्छिंद्र बनकर, बबन कुसळकर, संजय पुंड, सुधीर पुंड, चंद्रकांत पुंड,रमेश सानप, बापु इंगळे, विष्णु पाबळे, सुधाकर पवार, योगेश पिंपळे, शैलेश धोपटे, अशोक औटी, रमेश बिडवे, डॉ.रणजीत सत्रे, बाळू वखरे, भाऊसाहेब कोल्हे, संतोष जाधव, रवी वारे, सुरेश चुटके, मल्हारी गीते, संदीप घुले, सुरेश आंबेकर, शिवाजी मदने, सौ.रोहिणी बनकर, छायाताई नवले, सुधाकर कानडे, जयदीप ऋषी, कविटकर मामा आदिसह कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप परमेश्वर महाराज गायकवाड यांनी देखील या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. मनोगत व्यक्त करताना माऊली गायकवाड म्हणाले दरवर्षी नवीन वर्षाला वेगवेगळे उपक्रम बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने मी राबवित असतो सर्वांचे सहकार्य मिळत असल्याने या माध्यमातून जनसेवा हा एकच उद्देश असल्याने सर्व उपक्रम यशस्वी होतात याचे समाधान वाटते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गवळी यांनी केले. तर बापू गायकवाड यांनी आभार मानले.