कोल्हापूर :
कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलाय. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहोचवण्याचा काही जणांचा डाव होता. गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तिघांना कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
टेनिस बॉल कापून पुन्हा चिकटवलेले हे बॉल आणि १५ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही संशयित पुण्याचे आहेत.