अहमदनगर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महानगर जिल्हा शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली . समाजाच्या दाळ मंडई येथील तेली पंचाचा वाडा येथे झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा .श्रीकांत सोनटक्के , लक्ष्मण देवकर , प्रकाश सैंदर, शिवदास चोथवे, डॉ. श्रीकृष्ण दारुणकर, सचिन म्हस्के यांची निवड झाली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदासजी तडस , कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या .
यावेळी रामदास महाराज क्षीरसागर, सुरेश देवकर, विनायक दारूनकर व सोनटक्के सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. समाजाच्या प्रगतीसाठी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा यावेळी करण्यात आली . समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीवर भर देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीवर यावेळी चर्चा झाली .
आरोग्य,शिक्षण,रोजगार निर्मिती, व्यवसायिक शिक्षण यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्र करावे लागेल. समाजाला या सुविधा मिळवुन देण्यासाठी सर्व समाजातील नूतन पदाधिकाऱ्यावर जाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत. भविष्यात समाज विकासाचा फार मोठा उपक्रम आपल्या विचाराधीन असून तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन अध्यक्ष रमेश साळुंके व सचिव विजय दळवी यानी केले आहे .
कोरोनामुळे देवाज्ञा झालेल्या समाज बांधवाना या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . तसेच कोरोनाकाळात अहोरात्र समाजसेवेत मग्न असलेल्या समाजातील कोरोना योध्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले . श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगावात सचिन क्षीरसागर या व्यावसायिकास दुकानात घुसून गावातील समाज कंटकांनी अमानुष मारहाण करून दुकानातील फर्निचरची मोडतोड केली होती. या घटनेचा निषेध करीत या गुंडांना अटक करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली .
याप्रसंगी डॉ. गौरव मचाले , विभागीय अध्यक्ष हरिभाऊ डोळसे, प्रसाद शिंदे गोकुळ कोटकर , दत्ता करपे , परशराम सैदर, दिलीप साळुंके, विलास करपे, चंद्रकांत लोखडे, रावसाहेब देशमाने, चंद्रकांत दारूणकर, वसंत काळे, नारायण उगले , किरण शिंदे, बाळा जुंदरे, देविदास साळुंके सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
आभार प्रदर्शन सह सचिव गोरख व्यवहारे यांनी केले. कार्यक्रम सूत्रं संचालन सचिव विजय दळवी यांनी केले.
नूतन पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष गजानन शेलार, महासचिव डॉ.भूषण कर्डिले, विभागाध्यक्ष आर टी चौधरी, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, नाशिक विभागीय सचिव रत्नाकर करंकाळ, महानगर जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णकांत साळूंके, यांनी अभिनंदन केले आहे.
नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे : *उपाध्यक्ष*
प्रा. श्रीकांत सोनटक्के
डॉ. श्रीकृष्ण दारुणकर
लक्ष्मण देवकर
प्रकाश सैदर
शिवदास चोथवे
सचिन म्हस्के
संघटन सचिव
दत्तात्रय करपे
अँड. विनायक दारुणकर
नारायण उगले
वसंतराव काळे
पोपटराव शेजवळ
विष्णूशेठ गवळी
परशराम सैदर
संतोष ढवळे
सहसचिव
गोरख व्यवहारे
अशोकराव डोळसे
खजिनदार
कानिफनाथ मानुरकर
सहखजिनदार
किरण शिंदे
बाळासाहेब जुंदेरे
प्रसिद्धी प्रमुख
वैभव घोडके
सहप्रसिद्धी प्रमुख
रावसाहेब देशमाने
शशिकांत देवकर
सल्लागार
चंद्रकांत लोखंडे
दिलीप साळुंके
चंद्रकांत दारुणकर
शिवाजीराव शिंदे
शांताराम डोळसे
संपर्क व समन्वय प्रमुख
गोकुळशेठ बोकेफोड
रामदास (महाराज) क्षीरसागर
कायम निमंत्रित सदस्य
विजय हजारे
प्रकाश म्हस्के
संतोष दिवटे
बाबासाहेब दिवटे
विलास करपे
गणेश गवळी
देविदास साळुंके
वसंतराव वाव्हळ
ज्ञानेश्वरसाळुंके,
दत्तात्रय ढवळे
अनिल सैदर
राजेंद्र म्हस्के
राजेंद्र धारक
देविदास ढवळे
गणेश हजारे
राजेंद्र दारुणकर
सुरेश देवकर
भगवानराव लोखंडे
गणेश पलंगे,
गोकुळ शिंदे
माधवराव ढवळे
किसन क्षीरसागर
मा. संपादक
दै. अहमदनगर