रिक्षाचालकासह प्रवाशांना लुटले!
अहिल्यानगर : लाकडी दांडके व लोंखडी वस्तूने रिक्षा चालकांसह प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड असा ११ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील तिरंगा कंपनीसमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडलीयाप्रकरणी रिक्षा चालक प्रकास भानुदास मिरजे (वय ५०, रा. पार्टील गल्ली, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात चार अनोळखी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजे हे त्यांच्याकडील रिक्षामध्ये प्रवाशी भरुन ते सुपे येथे घेऊन जात असताना त्यांना चास घटातील तिरंगा कंपनीसमोर चार चोरट्यांनी अडविले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, लोंखडी वस्तू होती. त्यांनी मिरजे व प्रवाशांना मारहाण केली .