श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्यावतीने दि.7 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
नगर – श्रीराम मंदिर, नविपेठ, श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने तिथीनुसार अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती दिनानिमीत्त श्रीराम मंदिर नवीपेठ येथे श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने अयोध्या प्रमाणेच प्रतिष्ठा द्वादशी उत्सव मंगळवार दि. 7 जानेवारी ते शनिवार दि.11 जानेवारी 2025 पर्यंत पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच अयोध्या येथील मंदिराप्रमाणे आकर्षक मंदिर सजावट ट्रस्ट च्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सर्व शहरवासियांनी सहकुटूंब उपस्थीत राहुन प्रभु श्रीरामांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम मुथा व उपाध्यक्ष निखील शेटिया यांनी केले आहे.
मंगळवार दि.7 जानेवारी रोजी सकाळी 7:13 वा. पासुन दिनांक 8 जानेवारी सकाळी 7:13 वा. पर्यंत अखंड 24 तास ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ या तारक मंत्राचे नामस्मरणरुपी संगीत अनुष्ठान संपन्न होणार आहे , बुधवार दि.8 जानेवारी रोजी रात्री 8 वा. भक्तीरंग प्रस्तुत रामायणाचार्य श्री. गोरक्षनाथजी दुतारे महाराज (मुंबई दुरदर्शन कलाकार) ह्यांची श्रीराम भजन सेवा (भजन संध्या) व कार्यक्रमा उपरांत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार दि. 9 जानेवारी रोजी रात्री 8:00 वा. प.पु. स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य पं. श्री.गिरीराजजी व्यास (पुणे निवासी) यांचे सुमधुर वाणीत श्री संगीतमय सुंदरकांड (भक्तीमय संगीत कार्यक्रम) व कार्यक्रमा उपरांत महाप्रसाद ठेवण्यात आला आहे, शुक्रवार दि. 10 जानेवारी रोजी रात्री 8:00 वा. सुप्रसिध्द पं. राजेंद्र शर्मा (रामवाला) – सुप्रसिध्द गायक सी.ए. सागर शर्मा (नागपुर निवासी) ह्यांचा श्रीराम – हनुमान महिमा वर आधारित ॥ एक शाम प्रभु श्रीराम के नाम ॥ हा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होणार आहे,शनिवार दि.11 जानेवारी रोजी सकाळी 9:30ते दुपारी 12:00 श्रीरामलल्ला प्रतिष्ठा व्दादशी सोहळ्यानिमीत्त सामुहिक महा हनुमान चालिसा पठण व महाआरती दरम्यान सामुहिक भव्य शंखनाद व घंटानाद., सायं. .7:00 महाआरती व ढोलपथकाचे स्थीर वादन, असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
तरी सर्व कार्यक्रमास शहरवासियांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटूंब उपस्थीत राहुन प्रभु श्रीरामांच्या कृपाशिर्वादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.