एक कोटी चौतीस लाख सत्तावीस हजार आठशे सत्तर रुपये किंमतीचा कंपनीतील माल चोरी प्रकरणी 3 आरोपीस जामीन मंजूर !

सिंहगड रोड, नर्हेगाव येथील घटना

पुणे (प्रतिनिधी)

 

१,३४,२७,८७०₹ (एक कोटी चौतीस लाख सत्तावीस हजार आठशे सत्तर रुपये ) किंमतीचा कंपनीतील माल चोरी प्रकरणी 3 आरोपीस जामीन मंजूर !

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

सिंहगड रोड मधील नर्हेगाव येथील कोंढाळकर इंडस्ट्रियल इस्टेट येथील ललवाणी मेटॅलिक्स प्रा. ली व ललवाणी फेरो ऍलोय प्रा. ली कंपनी मधील फेरोमेली,फेरोसिलिकन, फेरोमागनिझ ,निकेल , निकेल मॅग्नेशियम , अल्युमिनियम नच बार , व इतर कच्चा माल चोरी गेला होता यात कंपनीचे मॅनेजर ऋषिकेश कापरे यांनी फिर्याद दिली . सदरील प्रकरणी एस .एस पारखी सो न्यायालयाने ३ आरोपींची प्रत्येकी २५ हजार च्या जातमुचालक्यावर जामिनावर सुटका केली.

 

याप्रकरणी आरोपींच्या वतीने ॲड . सागर वि. भोसले व ॲड .आदेश सो. चव्हाण यांनी आरोपींच्या वतीने जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने आरोपींचे वकील व सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून मुख्य आरोपी शरद दारवटकर( रा . नर्हे गाव ) , गणेश तनपुरे ( रा. भोर ) गणेश भारती ( रा.भोर) या आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.