पटवर्धन चौक मित्र मंडळाच्या वतीने महिलांच्या हस्ते आरती करुन श्री गणरायास निरोप

महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पाताई बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल महिलांनी त्यांचा सत्कार

अहमदनगर (संस्कृती रासने )-

शहरातील पटवर्धन चौक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महिलांच्या हस्ते आरती करुन श्री गणरायास भावपुर्ण निरोप देण्यात आला. मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कविता गायकवाड, नंदा वाळके, विजया वाळके, सुनिला पाथरकर, मोहिनी अष्टेकर, गायत्री गायकवाड, जया ससाणे, शिल्पा गणगले, निर्मला गायकवाड, स्नेहल गायकवाड-देशमुख, मनिषा भिंगारकर, संगीता वाळके उपस्थित होते.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

मंडळाच्या वतीने महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पाताई बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल महिलांनी त्यांचा सत्कार केला. तसेच मंडळाचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी निमगाव वाघा ग्रामपंचायतचे सदस्य पै. नाना डोंगरे यांची सरपंच परिषदेच्या नगर तालुका सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वाळके, हरियालीचे सुरेश खामकर, मुकुंद वाळके, संतोष गडाख, मनोज गायकवाड, संतोष शिंदे, बबन सोनवणे,  संतोष भागवत, ससाणे मामा, तुषार डंभारे आदी उपस्थित होते.