गावच्या निवडणुकीत बांगलादेशी नागरिक मतदानाचा  हक्क बजावणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने घेतला आक्षेप 

अहमदनगर: 
        नगर जिल्ह्यातील पारनेर मधील सुपा  ग्रामपंचायत  निवडणुकीत बांगलादेशातील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रताप शासनाने केलाय, असा आरोप आहे. आता हा प्रकार शासनाने स्वतःहून केला  कि कुणाच्या सांगण्यावरून केला हा वेगळा विषय असला तरी गावच्या निवडणुकीत बांगलादेशी नागरिक मतदानाचा  हक्क बजावणार याला महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने आक्षेप घेतलाय.
        ग्रामपंचायत मतदार यादीत बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल ९१ बांगलादेशी नागरिकांची नावे जाहीर झालीयेत. स्थानिक  प्रतिनिधींनी ही बोगस नोंदणी केल्याचा आरोप मनसे ने केला  आहे.  याची लवकरात लवकर  चौकशी होऊन  दोषींवर कारवाई व्हावी आणि संबंधित नवे मतदार यादीतून वगळली जावी अशी मागणी  मनसे ने केलीय. याबाबत मनसे चे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी माहिती दिलीय.

नवीन मतदार नोंदणीसाठी १५ वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो. आणि तसा पुरावाही या नोंदणीत नाही हे माहिती अधिकारात सिद्ध झाले आहे. तरी या बोगस नवे असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये,  अशी मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, अविनाश पवार, नितीन म्हस्के, उपजिल्हा अध्यक्ष मारुती रोहोकले यांनी निवेदन दिले आहे. ही बोगस नवे वगळली न गेल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.