भगवान सुडके यांचे अल्पशा आजाराने निधन
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सुडके मळ्यातील भगवान गंगाधर सुडके यांचे शनिवारी (दि.4 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले.ते 76 वर्षीचे होते. धार्मिक, कष्टाळू व मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण, चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.