अहमदनगरमध्ये प्रथमच दि. २५ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक भव्य भक्तामरची अमरगाथा नाटिका
नगर- श्री भक्तामर स्तोत्र जैन धर्मियांचे सर्वश्रेष्ठ स्तोत्र मानले जाते. अशी कथा प्रचलित आहे की, श्री मानतुंग आचार्यांनी 48 कुलपांच्या आत कोठडीत बंद असताना या स्तोत्राची रचना केली. प्रथम तीर्थंकर ऋषभ देव भगवान ची स्तुती त्याच्यात केली आहे. एक एक स्तुती करता करता त्यांचे कुलूप आपोआप तुटून पडले.
या नाटिकेत श्री ऋषभ देव यांची जन्म कथा भक्तामर स्तोत्र ची रचना कशी झाली व त्याचा आत्ताच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो असे तीन अंकी नाटिकेचे मुख्य आकर्षण आहे की इचलकरंजी येथून लेखिका व दिग्दर्शिका मनाली मुनोत या शंभर कलाकारांसोबत भव्य स्टेजवर ही नाटिका प्रस्तुत करणार आहेत
अहमदनगर येथील न्यू संकल्प स्मार्ट सखी व तिलोक रत्न स्थानक वासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत आनंदधाम, अहमदनगर येथे केले आहे. जास्तीत जास्त लोकांनी नवयुवकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान या कार्यक्रमाचे दाता श्री सौरभ बोरा, आर एस बाफना जळगाव, रमेश फिरोदिया,राजेश भंडारी, सोनल चोपडा व संदीप भापकर यांनी केले आहे.
न्यू संकल्प स्मार्ट सखीच्या सगळ्या महिलांनी मिळून व अनेक दानदात्यांनी मिळून हा कार्यक्रम प्रयोजित केलेला आहे.