भारतीय दंड संहिता आजपासून असणार भारतीय न्याय संहिता
भारतीय दंड संहिता आजपासून भारतीय न्याय संहिता म्हणून अस्तित्वात येणार असून फौजदारी प्रक्रिया संहिता आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावाने ओळखली जाईल. भारतीय पुरावा कायद्याचे नाव आता भारतीय साक्ष अधिनियम या नावाने ओळखले जाणार आहे. केंद्र शासनाने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे. केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार कलमांच्या क्रमांकांमध्ये बदल होऊन काही कालबाह्य कायदे रद्द करण्यात आले आहेत. क्रमांकाबद्दल झाला असला तरी प्रमुख कर्मांच्या व्याख्येत फारसा बदल झालेला नाही. या बदलांमध्ये 12 जुनी कलमे वगळून 12 कलमांचा नव्याने समावेश केला आहे सहा गुन्ह्यांमध्ये समाजसेवेच्या विविध शिक्षेची तरतूद केली आहे उदाहरणार्थ- वाहतूक पोलिसांचे काम करणे, निबंध लिहिणे, सार्वजनिक स्वच्छता करणे अशा प्रकारच्या शिक्षेचा समावेश असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु याबाबत अजूनही स्पष्टीकरण आले नसल्याचेही सांगण्यात आले. 30 गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढवली असून 83 कलमांमध्ये आर्थिक दंड वाढवला आहे. दस्ताऐवजांमध्ये इलेक्ट्रॉनिक व डिजिटल रेकॉर्ड चा समावेश होणार असल्याने मोबाईल, सोशल मीडिया अशा माध्यमांचा वापर आता काळजीपूर्वक करावा लागणार आहे. नवख्या व्यक्तीला सोशल माध्यमांची माहिती व मोबाईलच्या हाताळणे अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. स्त्रियांविषयी कायद्यामधील तरतुदी आणि शिक्षा वाढवण्यात आले असून 376 चे बलात्कार संबंधित कलम आता न्याय संहितेत क्रमांक 69 ने ओळखले जाईल. नव्या सुधारणांमध्ये एकूण 23 कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद केली आहे. 30 जून पर्यंत नोंदवलेले गुन्हे जुन्याच कलमान्वये चालतील कायद्यातील या बदलांचा अभ्यास न्यायव्यवस्था पोलीस दल व प्रशासनातील सर्व यंत्रणांना आता दैनंदिन कामकाजात सराव होईपर्यंत सतत हाताळावे लागणार आहे. असे यातून दिसून येत आहे.