बिहार  निवडणुकीचा  निकाल 

bihar elections 2020

* बिहार निवडणुकीच्या निकालाबाबतच्या टॉप १० घडामोडी *

१.  

  बिहार विधान सभा निवडणुकीत  नितीश कुमार  यांच्या जनता दल युनायटेडला  मागील 2015 प्रमाणे यश मिळालेले नाही.  2015 मधील 71 जागांच्या तुलनेत या वेळी जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या आहेत.  त्यावेळी नितीश  कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल  आणि कॉंग्रेस सोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती .

२.  

आरजेडीने  75 जागा जिंकल्या आहेत .  त्यामुळे तो  राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे .   मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजप आघाडीवर असल्याचे  दाखवत होते .  मात्र , 16 तास चाललेल्या  मोजणीनंतर 74 जागां जिंकल्याने असलेल्या भाजपचे नाव आहे.

 ३. 

 चिराग पासवान यांच्या एलजेपीमुळे जेडीयूचे प्रचंड नुकसान झाले आहे.  एलजेपीने एक जागा जिंकली पण  कमीतकमी 30 जागांवर जेडीयूचे यामुळे नुकसान झाले आहे.

४.   

भाजपच्या  74 जागा आणि जेडीयूच्या  43 जागा मिळाल्या आहेत. यासोबत  सत्तारूढ आघाडीचे सहकारी हिंदुस्थानी आम मोर्चाला चार आणि विकास इंसान पार्टीला (व्हीआयपी) चार जागा मिळाल्या आहेत.

५. 
विरोधी महायुतीत आरजेडीने 75 जागा जिंकल्या, कॉंग्रेसला 19, सीपीआय ने  12 आणि  माकपने दोन जागा जिंकल्या.

६.

या निवडणुकीत एआयएमआयएमने पाच जागा जिंकल्या असून एलजेपी व बसपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे .  एक जागा जिंकण्यात अपक्ष उमेदवार यशस्वी झाला आहे.

 ७.  
पप्पू यादव आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा दावा करणारे पुष्पम प्रिया हे  या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

८.               

‘नितीशकुमार’ सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची  शपथ घेतील.  यामुळे संपूर्ण देशाच्या विधान सभा निवडणुकीत  एक इतिहास घडणार आहे.  सन 2000 मध्ये त्यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली परंतु बहुमताअभावी राजीनामा द्यावा लागला होता .  त्यानंतर त्यांनी 2005, 2010, फेब्रुवारी 2015 , नोव्हेंबर 2015 आणि 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती .

९.       

 नालंदा जिल्ह्यातील हिलसा विधानसभा मतदार संघातील निवडणूक रंजक होती. सत्ताधारी जेडीयूचे उमेदवार कृष्णमूरारी शरण उर्फ प्रेम मुखिया यांनी राजदचे उमेदवार आणि विद्यमान आमदार शक्तीसिंग यादव यांना अवघ्या 12 मतांनी पराभूत केले.

१० . 

या निवडणुकीत नितीश सरकारच्या पाच मंत्र्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा मंत्र्यांमध्ये सहकार मंत्री जयकुमार सिंह, शिक्षणमंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा, नगरविकास मंत्री सुरेश कुमार शर्मा, परिवहन मंत्री संतोष निराला आणि रामसेवक सिंह यांचा समावेश आहे