ताडोबा व्याघ्र सफारीसाठी आलेल्या पर्यटकांची गाडी नाल्यात कोसळल्याने भीषण अपघात  

चंद्रपूर :
चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.  तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.  सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सना अग्रवाल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. 
 
आज सकाळी 10.30 च्या सुमारास चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वाराकडून एक वाहन पर्यटकांना घेऊन ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत होती.  त्यावेळी मासळ गावाजवळ भडगा नाल्यात या पर्यटकांचे वाहन कोसळले.  दरम्यान अपघातग्रस्त झालेले वाहन हे नागपूर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली  आहे.