मुंबई :
दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेनंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील संगीतकार, गीतकार आणि लेखक सलील कुलकर्णी यांनी देखील फेसबुकवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.
एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली, अशा शब्दांत सलील कुलकर्णी यांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलंय. ‘ताण..मनावर..कोणाचा ? परिस्थितीचा ? माध्यमांचा ? चर्चेचा ? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली. नि:शब्द झालोय.. शीतल आमटे.. का गं?,’ असं म्हणत सलील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.