तपोवन रोड परिसरात दोन गटांत हाणामारी

अहमदनगर :

सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरामधील एसटी कॉलनी इथे २५ नोव्हेंबरला  दोन गटांत तुफान हाणामारी झालीय.  या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून २० जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  सकाळी साडेआठच्या सुमारास हि घटना घडलीय.  

 

ज्योती पवन काळे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या घरासमोरील गणेश मंदिराच्या बांधकामासाठी पुढाकार घेतल्याचा राग मनात धरून आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केलीय,  म्हणून साहिल रझाक इनामदार, सोहेल रझाक इनामदार, अदनान जहूर शेख, नदीम जहूर शेख, नीलम हरून इनामदार आणि अनोळखी दोन-तीन अशा दहा जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

 
याबाबत जुबेदा रझाक इनामदार यांच्या फिर्यादीवरून देखील उर्मिला काळे,ज्योती काळे,संगीता बारवेकर,करुणा काळे, रेणुका गाडे, ज्योती वाघचौरे, कुसुम कंद, जयश्री दरंदले, उमेश काळे आणि इतर तीन अशा एकूण बारा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत.