ख्रिस्तजन्मोत्सव आयोजित कार्यक्रम अंतर्गत धार्मिक नाटीका व समुह नृत्य सादरीकरण

अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय.चर्च यांच्या वतीने

नगर – अहमदनगर पहिली मंडळी, सी. एन. आय.चर्च हातमपुरा लहान लेकरांचे म्हणजेच संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ आणि तरुण संघ यांनी सुध्दा सहभाग घेतला. बायबलमधील व्यक्तीरेखेवर आधारीत लहान लेकरांनी वेषभुषा आणि ख्रिस्तजन्मोत्सव नाटीका, धार्मीक गाण्यावर समूहनृत्य आणि वैयक्तिक नृत्य सादर केले, चर्चच्या सभासदांनी हया लहान लेकरांना प्रोत्साहन दिले त्यांना वैयक्तिक बक्षीस देउन त्यांच्या कलेचा सन्मान आणि कौतुक केले. त्याचप्रमाणे महिला मंडळ यांनी नाताळ साजरा करीत असतांना प्रभु येशुला आपल्याकडून काय अपेक्षित आहे? याचे महत्व नाटीकेद्वारे पटवून दिले. तरुण संघाने समुहनृत्य आणि संगीत नाटीका सादर केली. संगित नाटीकेमधून आजचा तरुण व्यसनाधीन आणि मोबाईल वेडा झालेला असल्यामुळे परमेश्‍वराच्या आशिर्वादापासून कसा दुर गेला आहे? आणि जर जगातील या सर्व मोहपाशापासून स्वतःला दुर ठेवले आणि परमेश्‍वराची आराधना केली तर परमेश्‍वर आशिर्वादांची वृष्टी करतो. असे या नाटीकेद्वारे तरुण संघाने समाजप्रबोधन केले. या कार्यक्रमामध्ये लहान लेकरांपासून वयोवृध्द सभासदांनी सहभाग नोंदविला आणि विविध कला या प्रसंगी सभासदांनी सादर केली.
हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता चर्चचे धर्मगुरु रेव्ह अभिजीत तुपसुदरे, सचिव श्री सतिश मिसाळ, उपसचिव श्री प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदारख्त्री सॅम्युएल बोर्डे, कार्यक्रम समिती अध्यक्ष श्री प्रसन्ना शिंदे, प्रा. विनीत गायकवाड, श्री रविद्र लोंढे श्री सुनित ढगे, श्री अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, सौ. शोभना गायकवाड, सौ. वंदना शिंदे, सौ. कांदबरी सुर्यवंशी, सौ. शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे हया कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले. महिला मंडळ, चर्च सभासद हयांचे मोलाचे सहकार्य लाभले.