खंडणीखोर पत्रकार बॉक्सरवर आणखी एक गुन्हा दाखल

अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन आष्टीचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे व्यावसायिक अकीब उर्फ अतिक मोहम्मद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे इस्माईल दर्याने उर्फ भैय्या बॉक्सर असं गुन्हा केलेल्या दाखल झालेल्या तथाकथित पत्रकाराचे नाव आहे याने शेख यांच्याकडे तीन लाख 75 हजार रुपयांची मागणी करून ₹30,000 रुपये घेतले शेख यांचे कपड्यांचे दुकान असून त्यांची तथाकथित पत्रकार असलेल्या भय्या बॉक्सर सोबत ओळख झाली होती. त्यानंतर बॉक्सरने शेख यांना नगर पाथर्डी रस्त्यावरील स्टेट बँक चौकातील छावणी परिषदेच्या गाळ्यासमोर बोलून तू काय धंदे करतो ते मला माहिती आहे मी पत्रकार असून तू मला तीन लाख 75 हजार रुपये दे नाहीतर मी तुझी चॅनलला बातमी लावून बदनामी करेल अशी धमकी दिली होती धमकीला घाबरून शेख यांनी त्याला 18 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारा स्टेट बँक चौकातील रिज्यू यांच्या चहाच्या टपरीवर तीस हजार रुपये दिले होते दरम्यान त्यानंतरही त्याने 26 जून रोजी शेख यांच्याकडे उर्वरित तीन लाख 45 हजार रुपयांची मागणी केली तू पैसे न दिल्यास तुझी बातमी चैनल ला टाकेन अशी धमकी दिली व टाइम्स ऑफ अहमदनगर या वेब पोर्टलवर गुटखा विक्री बाबतची बातमी प्रसारित केली. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शेख हे बॉक्सरला भेटून तू माझी विनाकारण बदनामी करू नको मी कोणताही अवैध धंदा करीत नाही असे समजावून सांगितले असता त्याने शेख यांच्याकडे पुन्हा खंडण्याची मागणी केली अधिक तपास उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.