‘निवार’ चक्रीवादळ आज संध्याकाळी पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार
अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात
चेन्नई :
आज (25 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत ‘निवार’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा ममल्लापुरम आणि कराइकल किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग हा 120 ते 130 किमी प्रती तास असा असणार आहे. त्यानंतर हा वेग 145 प्रती तासांवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.