डॉ. विखे पाटील; कृषि महाविद्यालयात दिक्षारंभ कार्यक्रमा अंतर्गत नवागतांचे स्वागत!
सिनिअर व नवीन विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद महत्वाचा- डॉ.साताप्पा खरबडे
अहमदनगर : शिक्षणाची सुरुवात हि बालवाडी पासून होत असते. १५ व्या वर्षापर्यंत १० वी पर्यंत शिक्षण घेवुन महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह असतो. उत्साहाच्या भरात तरुण आपले भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यांच्या स्वप्नांना महाविद्यालयामुळे मार्ग मिळत असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्यांना सिनिअर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव त्यांच्याशी शेअर करावे. सिनिअर व नवीन विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद महत्वाचा आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष बी.एस्सी (कृषि) साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दिक्षारंभ २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.साताप्पा खरबडे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सस्थेचे सेकेटरी जनरल डॉ.पी.एम.गायकवाड उपसंचालक (तांत्रिक) प्रा. सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.एम.बी.धोडे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.साताप्पा खरबडे म्हणाले की,चालू शैक्षणिक वर्षापासून बी. एस्सी (कृषी) ६ वी अधिष्ठाता समिती नुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करावी त्याअतर्गत दिक्षारंभ हा कार्यकम महाविद्यालयात राबवावा. त्यामध्ये प्रत्यक्ष भेटी, माजी विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर, सिनिअर व नवीन विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद यावर भर द्यावा तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषी अभ्यासकमात बदल झालेला आहे. त्यानुसार प्रथम वर्ष प्रमाणपत्र, द्वितीय वर्ष-पदविका, आणि चार वर्ष पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र दिले जाईल असे नमूद केले तसेच त्यांनी महाविद्यालयाची प्रशंसा केली. प्रा.सुनिल कल्हापुरे म्हणाले की, या संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे कामी संस्था कटिबध्द आहे. महाविद्यालयातुन विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडल्यावर तो परीपूर्ण विद्यार्थी म्हणून ओळखला जावा या दृष्टीने शिक्षक मार्गदर्शन करत राहतात. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये स्नेहपूर्ण वातावरण तयार होवून त्याच्या मनातील भीती दूर व्हावी आणि त्याच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.थोडे यानी दिक्षारभ या कार्यकमाचे प्रास्ताविक करून त्यांनी महाविद्यालयामध्ये विविध अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती उपस्थितांना करून दिली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबाजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपीका मावळे यांनी केले व प्रमुख पाहुण्याची ओळख डॉ एस.बी.राउत यांनी करून दिली. तसेच कार्यकमाचे आभार प्रदर्शन डॉ.एच.एल. शिरसाठ यानी मानले.