सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील

बाभुळगाव मध्‍ये मेरा बुथ सबसे मजबुत कार्यक्रम संपन्‍न

राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात खा.विखे पाटील बोलत होते. अहिल्यानगर मधील लोकसभेच्या प्रचाराला आता रंग चढत चालला आहे. “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाच्या माध्‍यमातून त्‍यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुखांशी त्‍यांनी संवाद साथला. याप्रसंगी आ.मोनीकाताई राजळे यांच्‍यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात केवळ महायुतीच्याच उमेदवाराला लोकांची पसंती मिळणार असून राज्यात ४५ हुन अधिक जागेवर मोठ्या मताधिक्याने कार्यक्रत्यांच्या जोरावर आपले उमेदवार निवडून येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला पुन्हा एकदा सक्षम आणि कतृत्‍ववान पंतप्रधान मिळणार आहे. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

डॉ.सुजय विखे म्हणाले महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही. आणि त्यांच्यातील वादच हे त्यांच्या नष्ट होण्याचे कारण असणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ४ जूनला राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडी आघाडीचा जनता दारुण पराभव करेल. कार्यकर्त्यांनी विरोधकांचा विचार न करता केवळ देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती घरोघरी पोहचविण्याचे आवाहन त्‍यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.