डॉ . एस एस दीपक आणि मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न

भिंगारकरांची अद्ययावत ट्रामा केअर सेंटरची गरज पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी ) : डॉ . एस एस दीपक आणि मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न ,गेल्या २० वर्षांपासून भिंगार आणि पंचक्रोशीत आपल्या वैद्यकीय सेवेद्वारे रुग्णाचे आरोग्य सुदृढ करणाऱ्या डॉ . सौ . कौशल्या आणि डॉ. किशोर म्हस्के दाम्पत्याने भिंगारमध्ये म्हस्के मल्टी हॉस्पिटल सुरु केले आहे. याठिकाणी मल्टी स्पेशालिटी , आय सी यु आणि ट्रामा हॉस्पिटलच्या सुविधा एकाच छताखाली आता भिंगारकरांना उपलब्ध होणार आहेत.

डॉ . किशोर म्हस्के यांना साईदीप हॉस्पिटल समूहाचे चेअरमन प्रसिद्ध हृदयरोग तद्न्य  डॉ  एस एस दीपक यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव आहे. दीपक हॉस्पिटल मध्ये त्यांची मोठी प्रॅक्टिस झाली आहे. त्यामुळे डॉ. दीपक हे या हॉस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्याच शुभहस्ते या भव्य हॉस्पिटलच्या इमारतीचे उदघाटन झाले. डॉ. दीपक यांनी फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून हॉस्पिटल चे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.

नगर पाथर्डी रोड विशेषतः कल्याण विशाखा पट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एका अद्ययावत अशा ट्रामा केअर आणि आय सीयूची गरज होती मस्के हॉस्पिटलच्या रूपाने ती पूर्ण झाली आहे. या हॉस्पिटल कडून अविरत रुग्णसेवा घडो अशी अपेक्षा डॉ.दीपक  यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. सुधीर तांबे  ,आ. सुरेश अण्णा धस , प्रशांत गडाख , अनिल झोडगे  अक्षय कर्डीले , नगरसेवक सुभाष लोंढे उपस्थित होते.   ५० बेडची क्षमता असलेले हे हॉस्पटल असून   मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सह १० बेड चे सुसज्ज आय सी यु इथे आहेत. सेंट्रल ऑक्सिजन सुविधेसह , ट्रामा सेंटर , सी टी स्कॅन , डिजिटल एक्स रे , सोनग्राफी , व्हेंटिलेटर , फिजिओथेरपी तसेच डायलिसीस युनिट तिथे उपलब्ध आहे . डॉ राहुल बोऱ्हाडे , धनंजय वारे मनोज जगदाळे , शीतल परहर, अशोक शिंदे , अनिल जाधव प्रशांत जाधव , संदीप बांगर , विनोद श्रीखंडे , जयश्री रैराळे, विनोद श्रीखंडे, बापूसाहेब गाडे , निसार शेख कल्पना गायकवाड अशोक कराळे अशा तद्न्य डॉक्तरांची टीम रुग्णसेवेत मग्न असणार आहे.  त्यामुळे पंचक्रोशीतील रुग्णांना भिंगारमध्येच जागतिक दर्जाची रुग्ण सेवा उपलब्ध झाल्याने त्यांना आता अत्याधुनिक उपचारासाठी नगर किंवा मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली . डॉ. किशोर म्हस्के यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. भिंगारकरांनी आपल्यावर आजतागायत दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम यामुळेच आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची भिंगारकरांची गरज पूर्ण करू शकलो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. भिंगरकरांचा विश्वास , आरोग्य आणि सेवाभाव जपणाऱ्या  म्हस्के मॅलिटीस्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या टीम ला शुभेच्छा देण्यासाठी डॉ . म्हस्के यांचे आप्तेष्ट , मित्रपरिवार मोठ्या संख्येन उपस्थित होते .

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.