कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू

या मतदार संघात मुली होतील सुरक्षित

जामखेड (प्रतिनिधी):  कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू  करण्यात आले आहे.  राज्य शासनाच्या एकात्मिक विकास प्रकल्पातून पोलिसांना  गस्तीसाठी दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जामखेड पोलिस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आले आहे.  यावेळी कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, सौभाग्यवती कुंतीताई पवार, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, ज्योती बेलेकर, पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, संजय कोठारी, प्रा. लक्ष्मण ढेपे, हर्षल डोके, नगरसेवक दिंगाबर चव्हाण, प्राचार्य श्रीकांत होशिंग, हरीभाऊ ढवळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, मयुर भोसले, राजेश वाव्हळ, राजू गोरे, अमोल लोहकरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Also see and subscribe

यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, कर्जत-जामखेड व श्रीगोंदे मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात यामुळे स्त्रीयांचे आरोग्य धोक्यात येते हे सर्व आपणास रोखायचे आहे. पुर्वी कर्जत जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी दहशत होती याचा सामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कर्जत जामखेड ची विकासाच्या बाबतीत योग्य ओळख निर्माण होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी चांगले अधिकारी रत्ने आणलेली आहेत. शहरासह तालुक्यात चांगली शिस्त निर्माण झाली आहे. आता पावसाचे पाणी अडवून साठवणूक करावयाची आहे व विजेसाठी सोलरचा जास्तीत जास्त वापर करावयाचा आहे.

यावेळी बोलताना जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, कर्जत-जामखेड व श्रीगोंदे येथे आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही मुलीच्या स्वच्छता गृहात तक्रार पेटी ठेवणार आहोत. महिला शिक्षिकेच्या मदतीने पेटी उघडण्यात येईल. मिळालेल्या वाहनांचा उपयोग गस्त वाढवण्यासाठी व गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी होणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे याचेही यावेळी भाषण झाले,. ते म्हणले की , शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधे रस्त्यावर दिवसाही लाईट सुरू असतात.  यामुळे मोठय़ा प्रमाणात विजेचा अपव्यय होतो.  तो कमी करण्यासाठी अटो सेन्सार बसविण्यात यावेत अशी मागणी केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव म्हणाले की, मिळालेल्या वाहनांमुळे आम्हाला चांगले काम करता येणार आहे. रात्रीच्या पेट्रोलिंग व गस्तीसाठी हि वाहने उपयोगी ठरतील. यापुढे पोलीस संवादातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतील
प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड .