शेतकऱ्यांनो ई-पीक नोंदणी करा

आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क नना) येथे अहमदनगर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना विहीत मुदतीत ई- पीकपाहणी पूर्ण करता आली नव्हती. यामुळे राज्य सरकारने शेतकरी स्तरावर पीकपेरा नोंदण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. यानुसार आज शेवटचा दिवस असून आढाव यांनी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ई-पीक पाहणी केल्याने समर्थन शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात सुलभता येईल, तसेच नैसर्गिक अखंड आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे सरकारला शक्य होईल, तसेच ई-पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक – येथील क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे राज्यातील सुरू आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन झालेल्या करणे शक्य होणार आहे. खरीप हंगाम २०२४-२५ करिता १ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीकपाहणी करता येणार होती. सहायक/तलाठी स्तरावरील पीकपाहणी नोंदणी २४ सप्टेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात १९ सप्टेंबरपर्यंत ६०.१७ टक्के पीकपाहणी पूर्ण झाली असून, ४० टक्के क्षेत्रावरील पीकपाहणी होणे अद्याप बाकी आहे. नगर तालुक्यात ५०.७२ टक्के, नेवासा ७६.०२ टक्के, श्रीगोंदा ५०.२७ टक्के, पारनेर ५६.७१ टक्के, पाथर्डी ४६.०८ टक्के, शेवगाव ६६.५६ टक्के, कर्जत ४९.६६ टक्के, जामखेड ५४.०४ टक्के, संगमनेर ५९.८३ टक्के, अकोले ६७.०५ टक्के, श्रीरामपूर ७५.२६ टक्के, राहुरी ६६.२२ टक्के, राहाता ७०.१९ टक्के, कोपरगाव ६५.०३ टक्के ई-पीकपाहणी पूर्ण झाली आहे.