ई पीक वर्जन 3.0.2 ॲपद्वारे पिकांची नोंदणी करा
शेवगाव तालुक्यात 113 गावे आहेत. शासन निर्देशांकानुसार 1 ऑगस्टपासून खरीप हंगाम 2024 साठी शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी व्हर्जन 3.0.2 ॲप आपल्या मोबाईलमध्ये अद्ययावत करून घ्यावे. व लवकरात लवकर शेतातील पिकांची नोंद पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन केले. शासनाकडून पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केल्यास ते वाटप करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांचे पीक पेराची नोंद अँपद्वारे न केल्यास राज्य शासनाकडील अनुदान, बाधित शेतकऱ्यांना मिळणार नाही. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतीतील पीक पेराची नोंद तत्काळ इ पिक पाहणी अँपद्वारे करावी. अडचणी उद्भवल्यास संबंधित गावचे तलाठी, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, महसूल, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.