कोरोना व्हायरसचा एटा व्हेरिएंट

आतापर्यंत अल्फा व्हेरिएंट आणि डेल्टा व्हेरिएंट ने घातला धुमाकुळ

वैष्णवी घोडके

कोरोना महामारीचा नवनवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय जगतातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला (Delta) जबाबदार ठरवण्यात आले होते. आता कर्नाटकमध्ये कोरोना व्हायरसचा एटा व्हेरिएंट (Eta Variant of Covid-19) समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये कोरोना व्हायरसच्या एटा स्ट्रेन व्हेरिएंटच्या एका प्रकरणाला दुजोरा मिळाला आहे. शास्त्रज्ञ ही माहिती जमा करण्याच्या प्रयत्नात आहे की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी या व्हेरिएंटचे काही कनेक्शन आहे का. भारतात आतापर्यंत अल्फा व्हेरिएंट (Alpha Variant) आणि डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) ने धुमाकुळ घातला आहे.

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने एक दिवसापूर्वी एका रूग्णाचा मृत्यू झाला. डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्रातील हा तिसरा मृत्यू आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटने पहिला मृत्यू रत्नागिरी तसेच दुसरा मृत्यू मुंबईत रिपोर्ट केला गेला होता. रायगड जिल्ह्याच्या कलेक्टरने डेल्टा प्लस व्हेरिएंटने 69 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सस्क्राइब करा. 

 

 

 

 

यापूर्वी मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटने एका 63 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता.या महिलेने व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले होते, तरी सुद्धा कोरोनाने तिचा मृत्यू झाला.21 जुलैला ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. यानंतर 27 जुलैला तिचे निधन झाले होते.

कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसात एकुण 543 मुले कोविड पॉझिटिव्ह आढळली.
एकुण 543 पैकी 270 मुली आणि 273 मुले आहेत.
बंगळुरू महानगरपालिका (बीबीएमपी) ने सांगितले की, 502 मुलांमध्ये हलकी लक्षणे होती.
कोरोना व्हायरसने संक्रमित मुले 0-19 वर्ष वयोगटातील आहेत
आणि ही संख्या बेंगळुरूच्या दैनिक कोविड गणनेच्या 12-14 टक्के भाग आहे.