विश्व हिंदु परिषदे तर्फे अखंड भारत संकल्प दिन साजरा भारतमातेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे -मिलिंद मोभारकर

अखंड भारत संकल्प पूर्णत्वास जावो

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

 अखंड भारत संकल्प दिन सर्वत्र साजरा होत आहे.अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे हि सर्व भारतीयांची इच्छा आहे.अखंड भारत संकल्प पूर्णत्वास जावो आणि भारत अखंड राष्ट्र होऊन बलशाली होवो. सर्वानी स्वातंत्र्यदिन भारतमातेचे पूजन करून साजरा करावा.भारतमातेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे.असे प्रतिपादन प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर यांनी केले.                                                    

 

 

 

 

गांधी मैदानात विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी मिलिंद मोभारकर यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून कार्यक्रमाचं सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,जिल्हामंञी गजेंद्र सोनवणे,प्रगत विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,जिल्हा सहमंञी गौतम कराळे,मठ मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,शहरमंञी श्रीकांत नांदापुरकर,निलेश चिपाडे,संतोष दीक्षित,राजेंद्र चुंबळकर,दिपक वांढेकर,अनिल देवराव,मनोहर भाकरे,ललित गांधी,दिलीप रोकडे,विजय गरड,चंद्रकांत रासकर,सुनील गाडगे,आशा मगर ,अनिता सरोदे ,श्रीमती जयमाला भोरे,गुलसत्ता शेख,लोहान सर,देशपांडे आदी उपस्तिथ होते.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सस्क्राइब करा. 

 

 

 

जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे म्हणाले कि,भारत हि पवित्र,पावन व देवभूमी  आहे.प्राचीन इतिहास असलेले आपले राष्ट्र जगाच्या नकाशावर खूप मोठा भू प्रदेश व्यापून होता.पण या प्रदेशाचे विभाजन होत गेले आणि अखंड भारत खंडित झाला.१४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत मातेला खंडित करण्यात आले.भारतात असलेले काही प्रदेश वेगळे होऊन पाकिस्तान व बांगलादेशाची निर्मिती झाली.यापूर्वी अफगाणिस्तान,नेपाळ,भूतान,तिबेट ,ब्रह्मदेश,श्रीलंका भारत भूमीपासून वेगळे झाले.१४ ऑगस्ट हा दिवस भारत संकल्प दिवस आजच्या दिवशी अखन्ड भारत पुन्हा एकदा गत वैभवाने एक संघ भारत मातेच्या छात्र छायेखाली येईल यासाठी संकल्प करण्याचा दिवस.या संकल्प पूर्तीसाठी सर्व भेदाभेद विसरून जातपात,पंथ ,संप्रदाय वर्ण भेद भाषा प्रांत या भेदाच्या पलीकडे जाऊन अखंड भारत म्हणून एकत्र येऊन हा संकल्प न्यावयाचे आहे.त्यासाठी सतत कृतिशील राहणे गरजेचे आहे.सर्व भारतवाशीयांना अखंड भारत संकल्प दिनाच्या शुभेच्छा देतो.                       प्रा.सुनील पंडित म्हणाले कि, विश्वहिंदू परिषदेने अखंड भारत दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला आहे.सर्व भारतीयांच्या मनात भारत मातेबद्दल आदर आहे.सूत्र संचालन गौतम कराळे यांनी केले तर आभार अँड जय भोसले यांनी मानले.