नवी दिल्ली : महामार्गावर अनेक वाहनचालक जाणूनबुजून वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावत नाही. अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही जण मुद्दामहून वाहनांच्या समोरील काचेवर फास्टटॅग स्टिकर चिटकवत नाही. त्यामुळे टोल नाक्यावर इतर वाहनांना विनाकारण विलंब होतो. त्यामुळे संकलन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. समोरच्या काचेवर फास्टटॅग स्टिकर नसेल तर अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल वसूल करावा,असे त्यात म्हटले आहे.असे फास्टॅग ब्लॅकलिस्ट देखील केले जाऊ शकतात. फास्टॅग नसलेल्या वाहनांचा नोंदणी क्रमांक तसेच टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज देखील जतन करून ठेवण्यात येणार आहे. फास्टटॅग विकणाऱ्या बँकांनादेखील या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन चालकांनी फास्टटॅग समोरच्या काचेवर लावला की नाही? याबाबत त्यांनी खातरजमा करावी. 1000 पेक्षा जास्त टोलनाके राष्ट्रीय महामार्गावर आहेत. आठ कोटींपेक्षा जास्त वाहनांवर फास्टटॅग लावण्यात आलेले आहेत.स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा सर्व वाहनचालकांनी फास्टटॅग लावणे बंधनकारक आणि गरजेचे आहे.
Prev Post