कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आरास!

कानडा राजा पंढरीचा!!!!!

सोलापूर
कार्तिकी यात्रेच्या महासोहळ्या साठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 टन रंगबेरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा , महाद्वार,चौखांभी ,सोळा खांभी मंडप , परिवार देवता याठिकाणी 15 ते 20 देशी विदेशी फुलनी सजावट करण्यात आली आहे. झेंडू ,ओस्टर,ऑरेंज झेंडू ,शेवनती ,गॅलडियो ,कामीमीची पाने अश्या फुलांचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.विठूभक्त राम जांभुळकर यांनी ही सेवा दिलीय. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या फुलांनी या मंदिराची सजावट करण्यात आली आहे. फुलांनी केलेल्या आकर्षक सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणीचं रुप खुलले आहे. एकूणच हे दृश्यं मन प्रसन्न करणारं आहे.