26/11 मुंबई हल्ला

दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण 

मुंबई 

              मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्य्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.यामध्ये 166 लोकांनी जीव गमावला होता.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.
               ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे, यासह दोन रुग्णालय आणि एका थिएटरवर हा दहशवादी हल्ला करण्यात आला होता,  मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना सुद्धा या हल्य्यात वीरमरण आलं.
                  यामध्ये तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळसकर ,अशोक कामटे, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांसह अनेक जणांचा समावेश आहे. आज २६ नोव्हेम्बरच्या निमित्ताने सोशल मीडियावर सगळ्यांनी या हल्य्यात देशासाठी शहिद झालेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.