‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ’ संपर्क कार्यालयात बसून हजारो रुपयांची केली फसवणूक!
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य 'रेखा विधाते' यांनी केली तक्रार दाखल
अहमदनगर : केंद्र सरकार आणि राज्य महाराष्ट्र सरकार ने नागरीकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहिर केल्या आहे. पण या योजनेंचा गैरफायदा घेऊन कर्जत येथील व्यक्ती ‘महादेव डाडर’ हा विविध प्रभागातील आणि इतर भागातील वेगवेगळ्या महिलांना शासनाच्या योजनांची माहिती सांगूण त्यांच्याकडून पैसे घेत आहे. पैसे घेतल्यानंतर त्यांचं एकही काम न करता त्यांची फसवणूक केली आहे. महादेव डाडर यांच्या या फ्रॉडला बळी पडून अनेकांनी त्याला रोक स्वरुपात पैसे दिले आहेत. नंतर फसवणूक झालेल्या महिलांच्या लक्षात आल्यावर त्या महिलांनी त्याच्याकडे योजना आणि पैशांची मागणी केली असता. महादेव दादर हा व्यक्ती वेगवेळी कारणे सांगूण त्यांची टाळाटाळ करत होता.
या घटनेमध्ये अनेक महिलांची आणि पुरुषांची हजारो रुपयांची फसवणुक झालेली आहे. ही सर्व घटना लक्षात घेऊन प्रभागातील महिला (महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य) ‘रेखा रामा विधाते’ यांच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक यांच्याकडे महादेव डाडर या व्यक्तीबाबत तक्रार दाखल करण्यासाठी फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांचे नाव, सही आणि दिलेली रक्कम लिहून अर्ज करण्यात आला आहे. महादेव डाडर या व्यक्ती विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा आणि गरीब महिला पुरुषांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
इसम नामे महादेव किसन डाडर याने शासकीय कामाचे तसेच विविध योजनांच्या नावाखाली खालील लोकांकडुन कागदपत्रे व पैसे घेवुन त्यांचीदेखील फसवणुक केली आहे.
1) आशाबाई आंबेकर : 1000/-रुपये (श्रावण बाळ योजनेसाठी)
2) सिंधु आसाराम बोरुडे : 3000/-रु.
3) नाना पाचारणे : 1000/- रु. (पेन्शन योजना)
4) बबई पाचारणे : 1000/-रु. (पेन्शन योजना)
5) विठठल गायकवाड : 1300/-रु. (पेन्शन योजना)
6) अनिता पुंड : 1000/-रु. (पेन्शन योजना)
7) शांतीलाल सोमाजी गायकवाड : 1300/-रु.
8) सुशिला दसरथ गोरे : 1000/- रु. (पेन्शन योजना)
9) जयश्री रमेश शिंदे : 1500/-रु. (शिलाई मशिन)
10) सिध्दार्थ काशिनाथ जाधव : 3200/-रु. (थयोश्री योजना)
11) अशोक भाऊसाहेब लाळगे : 3300/-रु.
12) संगिता डाके : 3000/-रु. (रेशनकार्डसाठी)
13) हिराबाई ताकवाले : 1000/-रु.
14) पारुबाई गुलाब पाडळे : 500 रु.
सर्व राहणारे रेल्वेस्टेशन परिसर, आगरकरमळा, अहमदनगर अशी एकुण 43,100/-रुपये, येणेप्रमाणे माझेकडुन व वरील लोकांकडुन महादेव किसन डाडर याने शासकीय कामे करुन देण्याचे नावाखाली पैसे व कागदपत्रे घेवुन शासकीय कामे न करता पैसे व कागदपत्रे परत न करता फसवणुक केली आहे.